पॉपकॉर्न ते गाडी - GST च्या बैठकीत घेतले 'हे' महत्वाचे निर्णय
22-Dec-2024
Total Views |
जयपुर (GST Council): भारताच्या करप्रणालीमध्ये जीएसटीने सुधारणा झाली असून, करव्यवस्था सुदृढ झाली आहे. अशातच आता जीएसटी परिषदेच्या ५५व्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दिनांक २१ डिसेंबर रोजी केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानच्या जैसलमेर येथे पार पाडली. या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी सुद्धा उपस्थित होते. त्याच बरोबर गोवा, हरियाणा, जम्मु आणि काश्मीर, ओडिशा, मेघालय, या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत घेण्यात आलेला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे फोर्टिफाइड राइस कर्नल वरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याच बरोबर जीन थेरपी वरील जीएसटी सुद्धा समाप्त करण्यात आला आहे. शेतकरी जर मिरची, मनुकाचा पुरवठा करत नसतील तर त्यांना जीएसटी लागणार नाही. जुन्या आणि वापरलेली कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. या वाहनांच्या विक्रीवर १२ ते १८ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. देशाबाहेर वस्तू पाठवणाऱ्या व्यापाऱ्यांवरील वेगळा सेस कमी करण्यात आला आहे. दुसऱ्या बाजूला रेडी टू इट पॉपकॉर्नवर आता ग्राहकांना कर द्यावा लागणार आहे. पॅकेज्ड पॉपकॉर्नवर तब्बल १२ टक्के जीएसटी मोजावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला व्हाउचरच्या संबंधित जीएसटी लावला जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे.