काँग्रेसच्या खोटेपणाची पोलखोल! प्रियांका गांधींविरोधात भाजपची उच्च न्यायालयात धाव
उमेदवारी अर्जात कौटुंबिक संपत्ती लपवल्याचा आरोप
21-Dec-2024
Total Views |
तिरुवनंतपुरम : वायनाडच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या प्रियंका गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कौटुंबिक संपत्ती लपवल्याचा आरोप भाजपच्या नाव्या हरीदास यांनी केला आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांचा विजय रद्द करण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आपल्या याचिकेत हरीदास यांनी म्हटले आहे की गांधी यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कौटुंबिक संपत्ती, दाखल केलेले गुन्हेगारी खटले या बद्दलचा योग्य तपशील दिला नाही. यामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप भाजपच्या नाव्या हरीदास यांनी केलं आहे. हरीदास यांच्यावतीने याचिका दाखल करणारे अधिवक्ता हरी कुमार जी नायर माध्यमांशी बोलताना म्हणाले की प्रियांका गांधी यांनी जाणीवपूर्वक जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची मालकीच्या विविध मालमत्तेबद्दल महत्वाची माहिती दडवली आहे. केरळ उच्च न्यायालय सदर याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी करणार असल्याचे बोलले जात आहे. वायनाड लोकसभेची ओळख म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या वर्षीच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या नाव्या हरिदास यांनी प्रियांका गांधी यांच्याशी निकाराने झुंज दिली. काँग्रेससह कम्युनिस्टांच्या फळीचा सुद्धा त्यांना सामना करावा लागला. शेवटी प्रियांका गांधी यांचा या निवडणुकीत विजय झाला परंतु त्यांच्या याच विजयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.