संयुक्त राष्ट्र संघात श्री श्री रविशंकर यांचे बौद्धिक

"विश्व ध्यान दिना"निमित्त "मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी"चे आयोजन

    21-Dec-2024
Total Views |

Sri Sri Ravishankar

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sri Sri Ravi Shankar United Nations) 
संयुक्त राष्ट्र संघात पहिल्यांदाच 'विश्व ध्यान दिवस' (वर्ल्ड मेडिटेशन डे) साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनने शुक्रवारी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पहिल्या विश्व ध्यान दिनानिमित्त 'मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महासभेचे अध्यक्ष फिलेमोन यांग, अवर सरचिटणीस अतुल खरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. दरम्यान ज्येष्ठ अध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांनी ६०० हून अधिक सहभागींना आपल्या प्रमुख भाषणातून मार्गदर्सन केले. त्यांनी आपल्या मुख्य भाषणात ध्यानाशी संबंधित अनेक फायदे आणि परिमाणांवर भर दिला.

हे वाचलंत का? : पाठ्यपुस्तकांवर अजूनही वसाहतवादाची छाप : अविनाश धर्माधिकारी

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पार्वथनेनी हरीश यांनी आपल्या भाषणात 'वसुधैव कुटुंबकम' या सभ्यतेच्या तत्त्वावर आधारित वैयक्तिक तृप्ती आणि आंतरिक शांतीचे साधन म्हणून ध्यानाच्या प्राचीन भारतीय पद्धतीचे महत्त्व अधोरेखित केले. जनरल असेंब्लीचे अध्यक्ष फिलेमोन यांग म्हणाले की ध्यानामुळे लोकांबद्दल करुणा आणि आदर निर्माण होतो.


अवर-सरचिटणीस अतुल खरे यांनी मानसिक आरोग्य आणि ध्यान यांचा अंतर्निहित संबंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांवर ध्यानाचा सखोल प्रभाव अधोरेखित केला. दि. ६ डिसेंबरजी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ डिसेंबर हा विश्व ध्यान दिवस म्हणून घोषित करणारा ठराव एकमताने मंजूर केला. हा ठराव एकमताने मंजूर करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली.