सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना सुनावले खडे बोल!
धर्म संसदेच्या विरोधातील याचिकेवर सुनवाई करण्यास नकार
20-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायलयाने प्रशांत भूषण यांनी न्यायलयात दाखल केलेल्या धर्म संसदेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. त्याच बरोबर न्यायालयाने उत्तर प्रदेश इथल्या अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर विचार करण्यास सुद्धा नकार दिला. यती नरसिंहानंद फाउंडेशनने १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर डासना येथील शिव शक्ती मंदिरात धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्म संसदेच्या आयोजनाच्या विरोधात प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. या संसदेमध्ये द्वेषमूलक भाषणं होण्याची शक्यता असल्याचा दावा प्रशांत भूषण यांनी केला. या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत मुख्य न्यायाधिश संजीव खन्ना म्हणाले की " उत्तर प्रदेश मधील अधिकाऱ्यांना या संबंधित सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. न्यायालयाकडे या व्यतिरीक्त अनेक गंभीर प्रकरणं आहेत. त्यामुळे या संदर्भात आपण उच्च न्यायालयाला संपर्क साधावा. आपण जर सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता, तर उच्च न्यायालयात निश्चितच जाऊ शकता. "