'मुफासा'च्या पोस्टरवर आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयस, संजय मिश्रा यांना दुय्यम स्थान!
02-Dec-2024
Total Views |
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज कलाकारांची मुलं आता चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करु पाहात आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षित असलेला 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या चित्रपटाचा हा प्रीक्वल असून अलिकडेच या अॅनिमेटेड चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला. प्रेक्षक चित्रपटासाठी जरी आतुर असले तरी एक मराठी कलाकार मात्र चित्रपटाचे पोस्टर पाहून संतापला आहे.
'मुफासा: द लायन किंग' या चित्रपटासाठी शाहरुख खानसोबत त्याच्या दोन्ही मुलांनी आर्यन आणि अबराम यांनी आवाज दिला आहे. याशिवाय मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी इतर पात्रांना हिंदीत आवाज दिला आहे. मात्र, चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुख खान पोस्टरवर शाहरुख, आर्यन आणि अबराम यांची नावं बोल्डमध्ये मोठ्या अक्षरात लिहिण्यात आली आहेत. तर इतर कलाकारांची नावं छोट्या अक्षरात लिहिली असल्यामुळे मराठमोळा कलाकार सौरभ चौघुले चांगलाच संतापवला असून त्याने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
मकरंद देशपांडे, श्रेयस तळपदे, संजय मिश्रा या दिग्गजांची छोट्या फॉन्टमधील नावं पाहून मराठी अभिनेता सौरभ चौघुलेने संताप व्यक्त केला आहे. सौरभने लिहिले आहे की, "शाहरुख खान समजू शकतो...पण आर्यन खान आणि अबराम खान यांची नावं बोल्डमध्ये का? बाकी दिग्गज मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, श्रेयस तळपदे यांची नावं अशी सेकंडरी लिहायचं किती चुकीचं आहे? नक्कीच या सगळ्यांचं फिल्म इंडस्ट्रीसाठीचं योगदान आर्यन खान आणि अबराम खान यांच्यापेक्षा जास्तच आहे", असं सौरभने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'मुफासा: द लायन किंग' चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी शाहरुख खानबरोबर त्याच्या दोन्ही मुलांनी म्हणजे आर्यन खान आणि अबरामनेही आवाज दिला आहे. शाहरुखने ‘मुफासा’ या मुख्य पात्राला हिंदीत आवाज दिला असून आर्यनने मुफासाचा मुलगा सिंबा आणि अबरामने तरुण मुफासाला आवाज दिला आहे. तसेच, श्रेयस तळपदे, मकरंद देशपांडे, संजय मिश्रा, मियांग चांग या कलाकारांनीही आवाज दिले आहेत. २० डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.