संभल जिल्ह्यात कट्टरपंथींनी पोलिसांवर गोळीबार करत केला हल्ला
लहान मुले, वृद्ध, महिलांचा हिंसाचारात समावेश
02-Dec-2024
Total Views |
उत्तर प्रदेश : संभल जिल्ह्यात काही दिवसांपासून तणावजन्य परिस्थिती आहे. मात्र आता काही कट्टरपंथी युवकांनी संभल येथे हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यास सुरूवात केली आहे. मात्र ही परिस्थिती हाताळण्यासाठी संभल येथे पोलीस तैनात झाले. यावेळी काही कट्टरपंथींनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचे वृत्त आहे. ही घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणात कट्टरपंथी लहान मुले, वृद्ध, महिलांचा हिंसाचारात समावेश आहे. आता प्रशासनाने वाकडे पाऊल टाकणाऱ्यांवर एकूण ७ एफआरआय दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी प्रशासनाकडून एकूण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एकूण ५ गुन्हे संभल येथील कोतवाली, तर २ गुन्हे हे नखासा पोलीस ठाणे हद्दीतील आहेत. कोतवाली परिसरात नोंदवलेल्या गुन्ह्यापैकी २ गुन्हे डीएसपी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांसह चौकी प्रभारी पदावर तैनात असलेल्या उपनिरीक्षकांच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली. या प्रकरणांमध्ये सपा खासदार झियाउर रहमान बुर्के, समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बाल यांच्याशिवाय २१ जणांवर आरोप करण्यात आला आहे. तर यासोबतच एकूण ९०० हल्लेखोर अज्ञात दाखवण्यात आले आहेत.
संभल हिंसाचाराची पहिली एफआयआर उपनिरीक्षक संजीव यांनी दखल घेतली. ते कोतवाली संभल येथील एकता पोलीस ठाण्याचे प्रभारी आहेत. यावेळी एफआरआय मध्ये ९०० हल्लेखोरांचा जमाव सर्वेक्षण थांबवण्यासाठी पुढे सरकत होता. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दगडफेक सुरू झाली. मशिदीत सर्वेक्षणाला परवानगी दिली जाणार नसल्याचे जमावाने जाहीर केले. यावेळी हल्ला सुरू असताना उपस्थित असलेल्या जमावाकडून हसन, अझीम, सलीम, रिहान, हैदर, वसीम, अयान.. पोलिसांची सर्व शस्त्रे आणि काडतुसे हिसकावून घ्या. त्यांना आग लावून ठार मारा, येथून कोणीही पळून जाऊ नये, अशा धमक्य देण्यास सुरूवात केली होती.
यावेळी जमावाने अश्रुधुराच्या नळकांड्या, रबर बुलेटसह अनेक पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेतली. यानंतर जमावाने पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार सुरू केला. या दगडफेकीत स्वत: उपनिरीक्षक संजीवसह काही पोलीस जखमी झाले. यानंतर जमावामध्ये असंख्य लोक असल्याने बळाचा वापर करून जमाव पांगवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
दुसरा गुन्हा संभल पोलीस ठाण्याच्या सार्थल चौकीचे प्रभारी दीपक राठी यांनी नोंदवला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान यांनी २२ नोव्हेंबर रोजी जामा मशिदीत केलेल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले. दीपक राठी यांनी आपल्या तक्रारीत असेही सांगितले की, हिंसाचारादिवशी समाजवादी पक्षाचे आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा सोहेल इकबालने जमावाचे नेतृत्व केले. या जमावाने पोलिसांवर दगडफेक करत गोळीबार केल्याची माहिती सांगितली आहे.
तिसऱ्या एसएचओच्या तक्रारीमध्ये हिंसाचाराच्या तपशीलावर उल्लेख केला आहे. याप्रकरणी तिसरा गुन्हा कोतवालीचे एसएचओ उपनिरीक्षक अनुज कुमार यांनी केला आहे. यावेळी काही कट्टरपंथी जमावाने अल्लाहू अकबरच्या घोषणा देत उन्माद केला होता. या जमावात १४ वर्षांच्या मुलांनी घोषणा दिल्या असून यामध्ये ७२ वर्षांच्या वृद्धांपर्यंत लोकांचा यामध्ये समावेश होता. यावेळी जमावाने पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांना ४ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. यावेळी चौघांचाही उपचारावेळी मृत्यू झाला.
एफआरआयनुसार, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवानही या हल्ल्याचे बळी ठरले. या एफआयआरमध्ये कट्टरपंथी समुदायातील एकूण २१ जणांच्या अटकेचाही उल्लेख आहे. यातील अनेक चोरट्यांकडे पोलिसांकडून लुटलेली शस्त्रे होती, तर काही अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली होती. संबंधित शस्त्रे ही १२ बोअर आणि ३१५ बोअरची पिस्तुल होती. हल्लेखोरांनी जाळपोळ करत खासगी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याचे वृत्त आहे.