लव्ह जिहाद, लँड जिहादविरोधात हिंदू एकजूट व्हा - टी. राजा सिंह

    02-Dec-2024
Total Views |

T. Raja Singh
 
देहरादून : देशातील उत्तराखंड राज्यात दशकांपूर्वी बांधलेल्या बेकायदेशीर मशिदी पाडण्याची मागणी केली आहे. देवभूमीत बेकायदेशीर बांधण्यात आलेले बांधकाम हटवण्याची आज खरी गरज असल्याचे उत्तरखंड येथील हिंदूंचे म्हणणे आहे. हिंदू गटांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहादच्या घटनांविरोधात लोकांना एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन भाजप नेते टी. राजा सिंह यांनी १ डिसेंबर रोजी केले आहे. ते उत्तराखंड येथील एका सभेत  बोलत होते.
 
मिळालेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, उत्तरकाशी महापंचायत येथे भाजप नेते टी.राजा सिंह यांच्यासह अनेकांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिंदूंकडे लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. उत्तर प्रदेशात बेकायदेशी कामांवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुलडोझर पॅटर्न पाहायला मिळाला होता.
 
मुख्यमंत्री धामी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चाय पे चर्चा करावी. योगी ज्या प्रकारे उत्तर प्रदेशात लँड जिहाद्यांना धडा शिकवतात. अगदी तसेच मुख्यमंत्र्यांनीही बुलडोझर आणायला हवा. आम्ही उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद, लँड जिहाद करून देणार नाही, असे टी. राजा सिंह म्हणाले आहेत.
 
 
 
दरम्यान, यावेळी गंगोत्रीचे आमदार सुरेश सिंह चौहान यांनीही या सभेला संबोधित करत असताना सांगितले की, शहराचे धार्मिक सार राखणे हे राज्यासाठी फार महत्त्वाचे आहे. राज्यात मांस, अंडी आणि दारूवर बंदी घालावी, असे ते म्हणाले होते. काही लोक या शहराचे वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आम्ही त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. उत्तरकाशी हे उत्तराखंड राज्यातील श्रद्धास्थान आहे. यामुळे याठिकाणी मांस, अंडी, दारूवर बंदी घालावी, असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
 
तसेच संबंधित अहवालानुसार, विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे ५०० लोक सहभागी झाल्याचे घोषित केले होते, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेने दिली होती.