न्यायमूर्ती यादव यांच्या विरोधातील महाभियोग प्रस्तावास आव्हान!
अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल
17-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : (Justice Shekhar Kumar Yadav) कपिल सिब्बल यांच्या नेतृत्वाखालील संसद सदस्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या विरोधात त्यांच्या वादग्रस्त टिप्पणीसाठी महाभियोग प्रस्ताव सादर केल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात या प्रस्तावाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
कपिल सिब्बल आणि इतर ५४ खासदारांनी न्यायमूर्ती यादव यांच्याविरोधात दाखल केलेल्या प्रस्तावावर कारवाई करण्यापासून परावृत्त करण्यासाठी राज्यसभेच्या अध्यक्षांना निर्देश देण्याची विनंती करत वकील अशोक पांडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
याचिकेनुसार, शेखर कुमार यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या – लीगल सेलच्या बैठकीत जे काही सांगितले ते हिंदू या नात्याने सांगितले. ज्या संघटनेशी ते संबंधित आहेत, त्या बैठकीला गेले होते. या सभेत त्यांनी जे काही बोलले ते सनातन हिंदू धर्माच्या अनुयायाच्या क्षमतेत होते, न्यायाधीशाच्या क्षमतेत नव्हते, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.