जामिया मिलिया विद्यापीठात समाजविघातक घोषणाबाजी सुरूच!
17-Dec-2024
Total Views |
नवी दिल्ली : जामिया मिलिया विद्यापीठातून देशविरोधी कारनाम्यांते पीक वेळोवेळी निघत असते, अशातच आता सीएए कायद्याविरोधी झालेल्या आंदोलनाला ५ वर्ष झाल्याच्या निमित्ताने १५ डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यामध्ये डावी संघटना ऑल इंडिया स्टुडेंट्स असोशियेसन आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांचा समावेश होता. या कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थांनी “तेरा मेरा रिश्ता क्या, ला इलाहा इल्लाल्लाह” आणि “हम क्या चाहते? आझादी.” अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.
२०१९ साली सीएए कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणून जामिया मिलिया विद्यापीठाकडे बघितले जाते. सीएए कायद्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवून दिल्लीमध्ये गहजहब माजवण्यात आला. या आंदोलनामध्ये जवळपास ५० जाणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या बाजूला १०० जणं गंभीर जखमी झाली. आणि आता ५ वर्षानंतर याच आंदोलनाला उजाळा देत, धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. कार्यक्रमाचे रूपांतर आंदोलनात झाले आणि अशातच कॉलेजच्या प्रशासनाने कँटीन आणि वाचनालय तातपुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली पोलिसांच्या विरोधात केली घोषणाबाजी!
आंदोलनाचा सगळा प्रकार झाल्यानंतर या बद्दलचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओ विद्यार्थी आंदोलन करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांची एक तुकडी परिसराबाहेर तैनात ठेवण्यात आली होती. परंतु आंदोलन कर्त्यांचा मुजोरपणा इतका वाढला की त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. हिंदूंच्या विरोधात झालेल्या या दंगलीचा 'उत्सव' अशा प्रकारे साजरा करण्यात आला.