मुंबई : केवळ हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. चित्रपटांतून एकत्र काम करण्यापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास जिनिलीया आणि रितेश यांनी केला आहे. दरम्यान, आज १७ डिसेंबर रोजी रितेश देशमुखचा वाढदिवस असून त्याच्या बायकोने जिनिलीयाने नवऱ्यासाठी विशेष पोस्ट केली आहे. सोशल मिडियावर सध्या जिनिलीयाची पोस्ट व्हायरल झाली असून रितेशचे चाहते त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
जिनिलीयाने पोस्ट करत लिहिले आहे की, “जर तुम्ही उत्कृष्ट मुलगा, खूप चांगला बाबा, best भाऊ, best नवरा म्हणून कोणाकडे पाहत असाल तर तो रितेश आहे आणि तो आधीच पूर्णपणे माझा आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रितेश. तळटीप- मी फक्त तुझी आहे यात काहीच रिफंड होऊ शकत नाही.” ही सुंदर पोस्ट लिहित जिनिलीयाने रितेशसोबतचा रोमँटिक फोटो देखील शेअर केला आहे.
जिनिलीयाच्या पोस्टवर कमेंट करत रितेशने लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यात तुझं येणं हे माझं भाग्यच आहे. आय लव्ह यू बायको. थँक्यू तू कायम बरोबर असतेस…बायको तुझ्यासाठी माझ्याकडे कोणतीच रिटर्न पॉलिसी वगैरे असू शकतच नाही.” दरम्यान, लवकरच रितेश देशमुख ‘हाऊसफुल ५’ आणि ‘मस्ती ४’ या नव्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.