लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता केव्हा मिळणार?

    16-Dec-2024
Total Views |
 
ladki bahin yojana
 
मुंबई : (Ladki Bahin Yojana) लाडकी बहीण योजनेंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात केव्हा जमा होणार? याकडे संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. मात्र लवकरच त्यांची प्रतिक्षा संपणार आहे. राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून नागपूर येथील राजभवनात मंत्रिमंडळ विस्तार होऊन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता खातेवाटप होताच डिसेंबर महिन्याचे पैश्यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान या महिन्यात १५०० रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
 
जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली होती. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे एकूण पाच महिन्यांचे हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. त्यापैकी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हफ्ते एकत्रच आचारसंहिता लागण्यापूर्वीच जमा करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात लागू झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेत तात्पुरता खंड पडला. मात्र पुन्हा एकदा आचारसंहिता संपताच संबंधित हालचालींना वेग आला आहे.