बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात दै. ‘मुंबई तरुण भारत’चे विलेपार्लेत आंदोलन

    14-Dec-2024
Total Views |
Maha MTB

मुंबई : बांगलादेश ( Bangladesh ) येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजांवर होणार्‍या हिंसक अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘महाएमटीबी’च्या वतीने विले पार्ले रेल्वे स्थानका बाहेर फलक निदर्शन करण्यात आले. विलेपार्ले येथे मुख्यतः महाविद्यालयातील तरुणांची संख्या अधिक दिसून येते. हिंदूंवरील अत्याचाराच्या विषयाचे गांभीर्य अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावे या हेतूने संपादक किरण शेलार यांच्यासह दै.‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी उपस्थित होते.