नवी दिल्ली : राज्यसभेत सलग तीसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ माजवला आहे. जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडल्यानंर आता जगदीप धनखड यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी आरोप केला आहे की ते सत्ताधाऱ्यांची तळी उचलून धरत आहे. यावर विरोधकांना जगदीप धनखड यांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. तसेच काही काळासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभापति जगदीप धनखड यांच्यावर आरोप केला की ते त्यांच्या कामकाजातून काँग्रेसचा आणि विरोधकांचा अपमान करीत आहेत. भाजपच्या नेत्यांना इतर नेत्यांच्या विरोधात बोलण्याचे प्रोत्साहन देत आहे. या आरोपवर जगदीप धनखड म्हणाले की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. या देशासाठी प्राण पणाला लावायची माझी तयारी आहे. मी आतापर्यंत तुम्हाला (विरोधकांना) खूप सहन केले. अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे परंतु तुम्ही आता संविधानाचा अपमान करीत आहात.
संसदेत घुमला 'जय संविधान' चा गजर
संविधानवर सुरू होणाऱ्या चर्चासत्राच्या आधी लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी जय संविधानचा नारा लागवला. संविधानाची छोटीशी प्रत हातात घेऊन काँग्रेसच्या अनेक खासदारांनी शपथ घेतली. संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत शुक्रवार, १३ डिसेंबर आणि शनिवार, १४ डिसेंबर रोजी चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी लोकसभेत संविधानच्या चर्चेला उत्तर देणार आहेत.