सिडको महागृहनिर्माण योजनेस मुदतवाढ

२६ डिसेंबर २०२४ पर्यंत देण्यात आली मुदतवाढ

    13-Dec-2024
Total Views | 18

cidco



नवी मुंबई, दि.१३ : प्रतिनिधी 
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या २६ हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेने १ लाख अर्जांचा विक्रमी टप्पा गाठला आहे. हे पाहता नागरिकांच्या विनंतीस मान देऊन या योजनेकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्यासाठी २६ डिसेंबर २०२४ पर्यंत ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदत संपुष्टात येईपर्यंत नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद कायम राहणार असल्याचा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
सिडकोतर्फे १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर “माझे पसंतीचे सिडकोचे घर” या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंअंतर्गत २६,००० सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर (प), खारघर (पू) (तळोजा), मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.या योजनेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना नवी मुंबईमध्ये आपल्या हक्काचे व परवडणाऱ्या दरातील घर घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून परिपूर्ण पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, दर्जेदार बांधकाम आणि नवी मुंबईतील समृद्ध जीवनशैली अनुभवण्याची संधी नागरिकांना या योजनेद्वारे लाभली आहे.
अधिकाधिक नागरिकांना योजनेकरिता अर्ज करता यावा व अर्जदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करता यावी याकरिता योजनेच्या अर्ज नोंदणीस २६ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच नोंदणी करताना बारकोड असलेले अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आणि १०० किंवा ५०० रु. मूल्याच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीकृत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट या पूर्वीच शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना सुरळीतपणे नोंदणी करता आली. आता या योजनेची इकेवायसी नोंदणी दिनांक २६ डिसेंबर २०२४ पर्यंत करता येईल.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121