मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी अश्विनी भिडे, सोबत MMRC चाही कार्यभार सांभाळणार

    13-Dec-2024
Total Views |

ASHWINI BHIDE
 
मुंबई : (Ashwini Bhide) राज्याचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांत प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री प्रधान सचिव या पदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून ब्रिजेश सिंह कार्यभार सांभाळला आहे.
 
तसेच त्यासंबंधी नियुक्तीपत्रक अश्विनी भिडे यांना पाठवण्यात आले आहे. या पत्रकात या नवीन पदाचा कार्यभार ब्रिजेश सिंह यांच्याकडून त्वरीत स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढत त्यांना तत्काळ आपल्या नव्या नियुक्तीचा पदभार स्वीकारण्यास सांगितले आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभारही सांभाळण्यास सांगितले आहे.