नवी मुंबई, दि.१३: सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या जमीनीवर, भूखंडावर मोठया प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत आहे. या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता पथकाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.
सोमवार, दि.९ डिसेंबर रोजी दिवसा सिडको कार्यक्षेत्रात मोहिम राबवत असताना संध्याकाळी ५ वाजता डंपर चालक जितेंद्र कुमार कनोजिया हा तरुण डम्पर चालक सिडकोच्या उलवे येथे डम्पर खाली करताना सापडला.याच्या विरुध्द न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच त्याचदिवशी दुपारी ४च्या सुमारास एकूण १४ डंपरमधून काही चालक एमटीएचएल अटल सेतु, मुंबई ते उलवे रोड, सेक्टर-12, उलवे नवी मुंबई परिसरात खाली करण्याच्या प्रयत्नात असताना मिळून आले.
या सर्व डंपर चालकच्या विरुध्द न्हावाशेवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashrta.gov.in या वेब साईट वर तसेच संबंधीत पोलीस ठाण्यात कळविण्यात यावे असे आवाहन सिडकोने केले आहे.