कट्टरपंथींनो, त्याचा चेहरा नीट ओळखा...”,वकील विष्णू शंकर यांना जीवे मारण्याची धमकी

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

    11-Dec-2024
Total Views |
 
Jama Masque
 
संभल : उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशीद येथे हरिहर मंदिर वादाप्रकरणी हिंदूंचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. एका निधी झा नावाच्या या सोशल मीडिया हँडलने वकिलाचे छायाचित्र पोस्ट केले आणि लिहिले की, मुस्लिमांनो त्याचा चेहरा नीट ओळखा...” अॅडव्होकेट जैन यांनी संभल जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यात हँडलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
संभलचे एसपी कृष्णा कुमार बिश्नोई यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रकरणाचा तपास अद्यापही सुरू असून ते म्हणाले की, सध्या हे सोशल मीडिया अकाऊंट कोणते आहे आणि ते कोठून चालवले जात आहे. याप्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी वातावरण बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही, असे एसपी बिश्नोई म्हणाले आहेत.
 
दरम्यान उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील जामा मशिदीच्या जागेऐवजी हरिहर मंदिर होते असे काही हिंदू साधू संतांचे म्हणणे होते. मात्र त्याजागी जामा मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा हिंदूंनी केला. आता त्यासाठी वकील विष्णू शंकर जैन हे जामा मशिदीविरोधात कायद्याची लढाई लढवत आहेत. मात्र सोशल मीडियावरून त्यांना धमकीचे मेसेज आल्याचे समजते.