बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच, प्रवाशांना करतात मारहाण

    11-Dec-2024
Total Views |
 
 
Hindus
 
ढाका : बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या अंतरिम सरकारने बांगलादेशी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायावर चादर टाकली आहे. मात्र याउलट अल्पसंख्याकांवर विशेषत: हिंदूंविरोधात जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा वास्तववाद आपल्याला स्वीकारावा लागत आहे. बांगलादेशात हिंदूंना रिक्षाचालकांकडून जाच होत असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशात ७९ दिवसांत हिंदूंविरुद्ध ८८ घटना घडल्याची माहिती बांगालदेशने मंगळवारी १० डिसेंबर २०२४ रोजी सांगितली.
 
बांगलादेश सरकारने आपली प्रतिमा वाचवण्यासाठी दावा केला की, अल्पसंख्याक हिंदूंवरील हिंसाचार त्यांच्या विश्वासावर आधारित नव्हता तर तो राजकीय आणि वैयक्तीक होता. पण याप्रकरणी सत्य याहून वेगळे आहे. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंचे म्हणणे आहे की, त्यांना बांगलादेशात नमून राहावे लागत आहे. सत्य असे आहे की, रिक्षावालेही डोळे वटारून पाहतात. वाहनाने ओव्हरटेक केली तरीही त्यांना मारहाण केली जाते.
 
ढाका येथे कापड कारखाना चालवणारे संजीव जैन यांनी हिंदू वृत्तमाध्यमाला याप्रकरणाची माहिती दिली आहे. केवळ १० दिवसांपूर्वी बांगलादेशात परतलेल्या जैन यांनी सांगितले की, तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. तेथे अल्पसंख्यांकांचे जीवन दयनीय होते असल्याचे चित्र आहे.