नल्लोरे : आंध्र प्रदेशातील नल्लोरे जिल्ह्यातून एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. भाग्यश्री नावाच्या एका ८ वर्षीय मुलीला ब्रेन ट्यूमरने ग्रासले होते. याच मुलीचा मृत्यू हा चर्च येथे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. एकूण ४० दिवस पीडितेच्या उपचारासाठी तिचे कुटुंब चर्चमध्ये होते. त्यावेळी तिच्यावर उपचार म्हणून प्रार्थना केली होती. मात्र याचा तिळमात्रही उपयोग झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तिचा ९ डिसेंबर रोजी सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी रावपेट, काळुवई मंडळ येथील एका दलित वसाहतीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला सतत डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता अशी माहिती आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिचे आई-वडील लक्ष्मय्या आणि लक्ष्मी यांनी तिला उपाचारावेळी नल्लोक आणि तिरूपती येथे अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आई-वडिलांना मुलीची शस्त्रक्रिया परवडत नसल्याने त्यांनी नातेवाईकांची आणि रुग्णालयाची मदत मागितली.
यानंतर, कुटुंबातील काही नातेवाईकांनी उपचारासाठी मुलीला अदुरूपल्ली येथील चर्च येथे दाखल करण्यात येणार असल्याची सूचना केली. देवाला प्रार्थना केल्याने मुलीची तब्येत बरी होईल असे सांगितले गेले. त्यावेळी युवतीचे कुटुंब तिला घेऊन तिला आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर ते तिथे ४० दिवस आपल्या मुलीच्या आजारपणासाठी चर्च येथे राहिले होते.