भारतीय जलक्षेत्रात बांगलादेशी मच्छिमारांची घुसखोरी

तटरक्षक दलाकडून झाली अटक

    10-Dec-2024
Total Views |

Bangladeshi fishermen
 
पारादीप : भारतीय जलक्षेत्रात घुसखोरी करत मासेमारी करणाऱ्या ७८ बांगलादेशी मच्छिमारांना तटरक्षक दलाने अटक केली आहे. या कारवाईदरम्यान दोन ट्रॉलरही जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले. एफव्ही लैला-२ आणि एफव्ही मेघना-५ अशी या जहाजांची नावे आहेत. त्यांना तपासणीसाठी पारादीप येथे दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या अहवालानुसार, भारतीय तटरक्षक दल रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आयएमबीएल वर गस्त घालत होते. ही सागरी सीमा भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांना विभागणारी आहे. पकडलेल्या सर्व घुसखोरांविरोधात सागरी क्षेत्र कायदा १९८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
 
 
 
त्यानंतर आता त्यांना दोन मासेमारी करणारे दोघेजण दिसले होते. त्यांना घेराव घालत त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी ट्रॉलरमधून एकूण ७८ जणांना अटक करण्यात आली असून त्यात ३७ जणांचा क्रू मेंबर्रचा समावेश होता. यावेळी दोन्ही जहाज बांगलादेशात नोंदणीकृत आहेत. जहाजावरील असलेल्या लोकांची पुढील तपासणी केली जात आहे.