मुंबई : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) अप्रेंटिस पदासाठी भरतीची सुवर्ण संधी आहे. १ डिसेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) ने अप्रेंटिसच्या नियुक्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. ECIL (Electronics Corporation of India Limited) मध्ये अप्रेंटिस पदासाठी १८७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठी वयोमर्यादा ही २५ वर्षे इतकी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
या पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्या. इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, येथे दिलेली महत्त्वाची माहिती जसे की रिक्त जागा, तपशील, शैक्षणिक पात्रता आणि पगार इत्यादी काळजीपूर्वक वाचा.