बांगलादेशच्या युनूस सराकारमध्ये हिंदू पत्रकारांची गळचेपी!
01-Dec-2024
Total Views |
धाका : बांगलादेश मध्ये युनूस सररकारच्या राज्यात अल्पसंख्यांक हिंदू समाजाला यातना भोगाव्या लागता आहेत. धर्मांध आणि कट्टरपंथीय यांच्याकडून हिंदू समाजावर होणारे अत्याचार शमण्याचे नाव घेत नाहीये. अशातच आता, हिंदू पत्रकार मुन्नी शाह यांना ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. धाका इथल्या कारवान बाजार इथून मुन्नी शाह यांना अटक करण्यात आली.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार जनता टॉवर येथील मीडिया कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर मुन्नी शाह यांना जमावाने घेरले. जमावाने तिची हेटाळणी केली, तिचा मार्ग अडवला व तिच्यावर खटला भरण्याची मागणी केली.काही वेळातच घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि रात्री १० वाजता अटक करण्यात आली. शनिवारी. त्यानंतर तिला तेजगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले व नंतर ढाका महानगर गुप्तहेर शाखेच्या कार्यालयात हलवण्यात आले. मुन्नी शाह या ‘एक टकार खबर’ या ऑनलाइन न्यूज पोर्टलच्या संपादक आहेत. नईम हवलदार याच्या मृत्यूच्या खटल्यात गोवण्यासाठीजाणीवपूर्वक मुन्नी शाह यांना अटक करण्याचे षडयंत्र बांगलादेशच्या शासनयंत्रणेकडून रचण्यात आले. नईम हवलदार या दंगलखोर इसमाची हत्या झाल्यानंतर ७ पत्रकारांना अटक करण्यात आले.
शेख हसीन यांचे सरकार कोसळ्यानंतर, आता पर्यंत २०५ हिंदू मंदिरांवर हल्ले करण्यात आले. मुस्लीम विद्यार्थींनी तसेच कट्टरपंथीयांनी हिंदू प्राध्यापकांना आणि प्राचार्यांना राजीनामा देणयासा भाग पाडले.