मंदिर तोडून त्याजागी आम्ही मशीद बांधू, कट्टरपंथी अल्पवयीन मुलाचे ब्रेनवॉश

    01-Dec-2024
Total Views |


Hindus 
 
आयोध्या : आम्ही आयोध्येतील श्रीरामाचे मंदिर तोडून त्याजागी मशीद बांधणार आहोत, हे मी आज सर्वांना सांगत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य मुहम्मद साबीरने केले आहे. यावेळी मुहम्मद साबीर एका युट्यूब चॅनेलसोबत बोलत होता. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
मुहम्मद साबीरला युट्यूब चॅनेलच्या वार्ताहराने प्रश्न केला की, तु शाळेत जातोस का? त्यावेळी साबीरने नाही असे उत्तर दिले. यावरून कट्टरपंथी समाजात काही अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉश केले जात असल्याची सत्यपरिस्थिती समोर आली आहे. त्यावेळी पुन्हा वार्तहाराने तुला मंदिरापासून समस्या का आहे? असा सवाल केला असता त्यावेळी त्याने मंदिरापासून समस्या असल्याचे उत्तर दिले होते.
 
 
 
त्यावर अल्पवयीन कट्टरपंथी मुलाचे कोणीतरी ब्रेनवॉश केले असल्याचे वार्ताहराने सांगितले. आपला देश हा हिंदुबहुल राष्ट्र असूनही आपल्या देशात एक अल्पवयीन कट्टरपंथी मुलगा आयोध्येतील श्रीराम मंदिर तोडून मशीद बांधणार असल्याचे वक्तव्य करतो. मात्र हिंदू मूग गिळून गप्प आहेत. पण याउलट हिंदूंनी मशिदीला तोडण्याचे वक्तव्य केल्यास यावेळी असंख्याने कट्टरपंथी आले असते आणि त्यांनी दंगा केला असता, असे संबंधित प्रतिक्रिया घेणाऱ्या डिजिटल माध्यमाने सांगितले. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.