मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षविरोधी भूमिका घेणार्या, तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करत जाणीवपूर्वक पक्षशिस्तभंग करणार्या आठ पदाधिकार्यांवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे, अकोला ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पुजा व्यवहारे, धुळ्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भामरे, दहिसर तालुकाध्यक्षा ममता शर्मा, तुमसर (भंडारा) तालुकाध्यक्ष धनेंद्र तुरकर, युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर आदींचा समावेश आहे.