“१० मिनिटांचा वेळ काढा आणि..”,श्रेयस तळपदेने नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन

    09-Nov-2024
Total Views |
 
shreyas talpade
 
 
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून त्याचीच धावपळ सुरु आहे. २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात मतदान होणार असून आता हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
 
अभिनेता श्रेयस तळपदे यानेही१० मिनिटांचा वेळ काढून आवर्जून मतदान करा असे आवाहन मुंबईत आयोजित एका रॅलीमध्ये केले.
अभिनेता श्रेयस तळपदे म्हणाला की, "२० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी १० मिनिटांचा वेळ काढून मतदान करण्यासाठी जा. आणि जर का तुम्ही असा विचार करत असाल की हम फ्लावर नही फायर है, हमारी उंगली मे पावर हे तर त्या बोटाचा मतदान करुन योग्य वापर करा".
 
दरम्यान, यावेळी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे देखील उपस्थित होत्या आणि त्यांनीही नागरिकांना घराबाहेर येत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पद्मिनी म्हणाल्या की, मी सगळ्यांना विनंती करते की २० नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाची आहे".