'दृश्यम ३' आणि 'शैतान २' येणार! अजय देवगणने 'गोलमाल'च्या सीक्वेलबाबतही दिली अपडेट

    09-Nov-2024
Total Views | 45
 
ajay devgan
 
 
मुंबई : सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण अभिनित सिंघम अगेन या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम या चित्रपट सीक्वेलचा हा पाचवा भाग प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरत आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट उत्तम कमाई करत असून आता अजय देवगणच्या गाजलेल्या 'दृश्यम', 'शैतान' आणि 'गोलमाल' या चित्रपटांचेही सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत.
 
अजय देवगणने नुकतीच 'पिंकविला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सीक्वेल्सबद्दल भाष्य केलं. 'शैतान २' आणि 'दृश्यम ३' वर काम सुरू असल्याचं अजय देवगणने सांगितलं. तो म्हणाला की, "सध्या 'शैतान २'च्या कथेवर काम सुरू आहे. तर माझी एक टीम दृश्यमच्या पुढच्या भागावरही काम करत आहे", असं त्याने सांगितलं. 'दृश्यम ३' आणि 'शैतान २' बरोबरच अजय देवगणच्या 'दे दे प्यार दे', 'सन ऑफ सरदार', 'धमाल' आणि 'गोलमाल' या चित्रपटांचेही सीक्वेल्स भेटीला येणार आहेत.
 
दरम्यान, २०१५ साली अजय देवगणचा 'दृश्यम' प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०२२ मध्ये दृश्यम २ आला होता. आणि आता 'दृश्यम ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने चाहतेही खूश झाले आहेत. तर, २०२४ मध्ये आलेल्या ‘शैतान’लाही प्रेक्षकांनी पसंती दिली होती. आणि आता त्याचाही दुसरा भाग येणार आहे. आणि ‘गोलमाल ५’ देखील लवकरच येणार असल्याची अधिकृत घोषणा रोहित शेट्टीने केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

एक डेपो, चार मेट्रो मार्गिका : मोघरपाडा येथे सर्वात मोठ्या एकात्मिक मेट्रो डेपोसाठी एमएमआरडीएला जमीन हस्तांतरित ; एमएमआरडीएने मोघरपाडा मेट्रो डेपोकरीता १७४ हेक्टर भूखंड केला संपादित; मेट्रो मार्गिका ४, ४ए, १० व ११ चे संचालन येथून होणार

सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे जिल्ह्यातील मोघरपाडा येथे एकूण १७४.०१ हेक्टर क्षेत्रफळ जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे. या जागेवर जागतिक दर्जाचा, एकात्मिक मेट्रो कार डेपो उभारण्यात येणार आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ए, १० आणि ११ या मार्गिकांसाठी एक केंद्रीय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121