समोसे गेले कुणीकडे?

    08-Nov-2024
Total Views |
 
 
Congress Samose
 
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारमध्ये समोसे गेले कुठे? याचा शोध सीआयडी घेत आहे. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार यांचा तसा परिचय जुनाच. त्यात हिमाचल प्रदेशमधील काँग्रसेच्या सरकारची तर्‍हाच निराळी. मुख्यमंत्र्यांसाठी आणलेले समोसे परस्परच कोणीतरी खाल्याने एक नवेच राजकीय नाट्य हिमाचल प्रदेशच्या राजकीय पटलावर रंगलेला बघायला मिळत आहे.
 
हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारमध्ये समोसे गेले कुठे? याचा शोध सीआयडी घेत आहे. काँग्रेस सरकार आणि भ्रष्टाचार यांचा तसा परिचय जुनाच. त्यात हिमाचल प्रदेशमधील काँग्रसेच्या सरकारची तर्‍हाच निराळी. मुख्यमंत्र्यांसाठी आणलेले समोसे परस्परच कोणीतरी खाल्याने एक नवेच राजकीय नाट्य हिमाचल प्रदेशच्या राजकीय पटलावर रंगलेला बघायला मिळत आहे. सीआयडीच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सक्खु उपस्थित होते. त्यावेळी त्यांना अल्पोपहार म्हणून एका प्रतिष्ठित हॉटेल मधून काही समोसे मागवण्यात आले होते. मात्र, कार्यक्रम संपला तरी, मुख्यमंत्र्यांपर्यंत समोसे न पोहचल्याने याबाबत शोधाशोध सुरू झाली. त्यावेळी कार्यक्रमस्थळी आलेले समोसे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्याआधीच कुणीतरी त्याचा फडशा पाडला होता. त्यामुळे नियोजकांचे नियोजनच ढासळले. अखेर समोसे नेमके कुठे गेले? याचा शोध घेण्यासाठी हिमाचल प्रदेश मधील चक्क सीआयडीच मैदानात उतरली आहे. त्यामुळे समोसे गेले कुणीकडे? याचा शोध सीआयडी घेत आहे.
 
या संपूर्ण प्रकरणामुळे हिमाचल सरकारवर प्रचंड टीका झाली असून, विविध माध्यमातून सरकारच्या भूमिकेवर व्यंगात्मक टिपण्णी करण्यात आली. अखेरीस हिमाचल सरकारने समोसे चोरी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश, त्यांनी सीआयडीला दिले नसून, सीआयडी स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करत असल्यची सारवासारव केली. मात्र, दिवसभर हरियाणामध्ये या समोसे कुणी खाल्ले? याचीच चर्चा सुरू होती. सीआयडीने केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी पर्यटन विभागाला समोसे कुणाला दिले असल्याची चौकशी केली. तेव्हा, पर्यटन विभागाने, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्याचे सांगितले. त्यामुळे त्या कर्मचार्‍यांनीच ते समोसे खाल्ले असल्याची शक्यता आहे. चौकशीतून जे पुढे यायचे ते येईलच. पण, आज जसे समोशांच्याबाबतीत घडले, तसे कोणत्या निर्णयाबाबतीत घडले तर, राज्याला त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. पण, एवढा शहाणपणा असलेले लोक काँग्रेसमध्ये कसे असतील? मुळात प्रश्न समोस्यांचा नसून, जबाबदारीने वागण्याचा आहे. कारण, मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘म्हातारी गेल्याचे दुख नाही, काळ सोकावतो त्याचे काय?’
 
कांगावेबाज राहुल
 
कांगावा करण्यात राहुल गांधी यांना तोड नाही. आजकाल संविधानाची लाल किताब फडकवण्यावरून युवराज राहुल गांधींनी पुन्हा एक नवा कांगावा केला आहे. नागपूरातल्या संविधान सन्मान संम्मेलन या काँग्रेसच्या प्रचार कार्यक्रमात लाल कव्हर असलेले संविधानाचे पुस्तक राहुल गांधी यांनी पुन्हा फडकवले. हाच प्रकार, त्यांनी लोकसभा निवडणुकीतदेखील केला होता. यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लाल किताबवरुन राहुल गांधींचा खरपूस समाचार घेतला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाला निळे मुखपृष्ठ असून, हे लाल कव्हर म्हणजे नक्षलवाद्यांच्या विचारांचे प्रतीक असल्याचा घणाघाती प्रहार त्यांनी केला होता. योग्य ठिकाणी लथ्थाप्रहार झाल्यानंतर, राहुल गांधी यांचा जीव गुदमरला. मग, परिस्थिती सावरण्यासाठी त्यांनी लाल पुस्तकाला नक्षलवादी म्हणणे, हा डॉ. आंबेडकरांचा अपमान असल्याचा कांगावा सुरू केला आणि लगेचच राहुल गांधींचा पलटवार अशी भालमण राहुल गांधीच्या हुजुरांनी केलीच.
 
पण, वास्तविक राहुल गांधी यांनी पलटवार केला नसून, त्यांनी परिस्थितीतून सहिसलामत सुटण्यासाठी सारवासारव केली आहे. वास्तविक फडणवीसांचा प्रश्न इतका मार्मिक आणि थेट होता की, तो वार राहुल गांधी यांना सहनच झाला नाही. सत्ता वाचवण्यासाठी देशावर आणीबाणी लादणार्‍या घरण्याचा वारसदार आज संविधान वाचवण्याच्या वांझोट्या गप्पा मारतो आहे आणि त्याची अपेक्षा आहे की, जनतेने भुलून यांना मतदान करावे? मुळात आज भाजपपासून संविधानाला धोका आहे असे म्हणता म्हणता, नागपूरच्या त्याच कार्यक्रमात जेव्हा मुखपृष्ठावर भारताचे संविधान लिहून आतमध्ये कोरी पाने असलेले नोटपॅड वाटली गेली, तेव्हा आपण संविधानाचा, पर्यायाने डॉ. आंबेडकरांचा अपमान करत आहोत असे नाही वाटले? वाटेल तरी कसे, ’स्व’ पलीकडे काहीही न दिसणार्‍या माणसांना दुसर्‍यांचा अपमान करणे नित्याचेच. त्यामुळे आपणच हुशार, आपल्या मुद्द्यांना कुणीही खोडू शकत नाही, आपल्याला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, अशी झिंग चढलेल्या राहुल यांची झिंग फडणवीसांच्या एकाच प्रश्नाने उतरली. या लाल किताब आणि अर्बन नक्षलवादाची चर्चा टाळण्यासाठी काहीतरी बरळले इतकेच.
 
कौस्तुभ वीरकर