धुळे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे येथील प्रचारसभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी "एक है तो सैफ है! ",असा नारा दिला होता. या नाऱ्याकडे आता धुळे येथील जनतेने लक्ष वेधून घेतले आहे. ते ८ नोव्हेंबर २०२४ रोजी धुळे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले होते.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलत असताना सांगितले की, आपल्याला एकजूट राहूनच काँग्रेसकडून खेळला जाणारा धोकादायक खेळ हाणून पाडण्याचे काम आपल्याला करायचे आहे. आपल्याला सध्या त्याच मार्गाचा अवलंब करत मार्गीकरण करायचे असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणावेळी काँग्रेस पक्षाला इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारतात पाकिस्तानी अजेंडा चालवू नका आणि फुटीरतावाद्यांची भाषा बरळू नका. त्यांचे छुपे हेतू काहीही एक करू शकत नाहीत. जनता नरेंद्र मोदींना आशीर्वाद देईल.
तसेच मोदी यांनी भारताच्या संविधानावर भाष्य केले आहे. भारताचे संविधान हे वैध असल्याचे ते म्हणाले होते. हा मोदींचा निर्णय आहे. जगातील कोणतीही शक्ती काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेऊ शकत नाही.