बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या! नारायण राणेंची जहरी टीका

    08-Nov-2024
Total Views |
 
Naranyan Rane
 
सिंधुदूर्ग : "शिवसेना पक्षाचा प्रमुख बाळासाहेबांचा पूत्र एका सभेत म्हणतो की, सोसायटीमध्ये तुम्हाला जर बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल, तर दिवाळीला कंदील उतरवा. त्यावेळी मला बाळासाहेब आठवले. असं बोलल्यावर त्यांनी याला गोळ्या घातल्या असत्या," अशी टीका भाजप नेते नारायण राणेंनी केली आहे. शुक्रवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी निलेश राणेंच्या प्रचारासाठी कुडाळमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते.
 
नारायण राणे म्हणाले की, "काही लोकांविषयी न बोललेलंच बरं. त्यांची भाषा सुसंस्कृत नाहीच पण राजकारणाला किंवा बाळासाहेबांना शोभेल अशीही नाही. ते काहीही बोलतात, शिव्यासुद्धा देतात. आपल्यातून माणूस बाहेर गेला की, त्याच्याबद्दल अपशब्द बोलतात. बाळासाहेब असताना एखादा कार्यकर्ता महाराष्ट्रात नावारुपाला येत आहे, असं कळल्यावर उद्धव ठाकरे त्याला कमजोर करण्याचे काम करत होते. 0अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना दोन दिवस मंत्रालयात गेले आणि आता परत मला मुख्यमंत्री करा असे म्हणतात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे २५ च्या वर आमदार निवडून येणार नाहीत," असा दावा त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : अतुल शाह
 
ते पुढे म्हणाले की, "राजकारणातील एवढा अज्ञानी माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी बाळासाहेबांना फार जवळून पाहिले आहे. साहेबांचा स्वभाव ज्वलंत निखाऱ्यासारखा होता. मराठी माणूस, हिंदूत्व आणि भारत याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांनी पैशासाठी राजकारण केले नाही. सत्तेसाठी हिंदुत्व सोडले नाही. पण उद्धव ठाकरेंनी काय केले? शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा तुकडा टाकल्यानंतर त्यांनी उडी मारली आणि मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब असते तर हे शक्य नसते. शिवसेना पक्षाचा प्रमुख बाळासाहेबांचा पूत्र एका सभेत म्हणतो की, सोसायटीमध्ये तुम्हाला जर बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल, तर दिवाळीला कंदील उतरवा. त्यावेळी मला बाळासाहेब आठवले. असं बोलल्यावर त्यांनी याला गोळ्या घातल्या असत्या," असे ते म्हणाले.
 
चारवेळा मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी काय केलं?
 
"शरद पवार ८४ वर्षाच्या वयात कोकणाच्या दौऱ्यावर आले होते. जाता जाता इथला विकास पाहून त्यांना असह्य झाल्याने त्यांनी माझ्यावर वैयक्तिक टीका केली. राणेंचे दोन पुत्र ज्याप्रमाणे वागतात त्यांना संस्काराची गरज आहे, अशी टीका त्यांनी केली होती. पण पवार साहेब तुमच्या घराण्याचे संस्कार माझ्याएवढे कुणालाच माहिती नाही. आम्हीदेखील राजकारणात अनेक वर्षे घालवली पण आम्ही राजकारण वैयक्तिक केलं नाही. तुम्ही आता मराठ्यांना आरक्षणाची मागणी करत आहात. चारवेळा मुख्यमंत्री असताना आरक्षण का दिलं नाही? चार वेळा मुख्यमंत्री असूनही रस्त, पाणी, वीज, शाळा, आरोग्य आणि दरदोई उत्पन्न वाढवण्याजोगा कारभार तुम्ही का केला नाही?" असा सवालही नारायण राणेंनी पवारांना केली आहे.