"पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर नाव द्या, औरंगाबादचे नाव औरंगाबादच असू द्या"

प्रकाश आंबेडकरांच्या चिंरजीवाने तोडले अकलेचे तारे

    08-Nov-2024
Total Views |

Sujat 
 
वाशिम : छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे येथे राज्य होते. आपण संभाजी महाराजांचा आदर करत पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या, औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबादच असू द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. ते वाशिमच्या रिसोड शहरात विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
 
"जोवर औरंगाबाद उच्च न्यायालयाचे नाव बदलणार नाही तोवर आम्ही औरंगाबाद असेच म्हणणार. औरंगाबाद येथे मुस्लिम समाजातील नागरिकांनी प्रस्ताव मांडला होता. औरंगाबाद येथील जुने शहर होते. ते आता एका विशिष्ट दरवाज्यात आहे त्याचे नाव औरंगाबादच असावे. त्या बाहेर एक नवीन शहर वसलेले आहे. त्यामुळे आता त्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असे नाव ठेऊ नका. यामुळे तेढ निर्माण होण्याची शक्यता", आहे असे सुजात म्हणाले होते.
 
बाळासाहेबांचे एक वाक्य आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे जे राज्य होतं ते पुणे येथे होते. आपण संभाजी महाराज यांचा आदर राखून पुणे शहरास छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या. औरंगाबादचे नाव औरंगाबादच असुद्या असे म्हणत त्यांनी अकलेचे तारे तोडले आहे.