घटस्फोटाच्या अफवांमध्ये अभिषेक-ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात एकत्र दिसणार?

    07-Nov-2024
Total Views |
 
abhishek aishwerya
 
 
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्यात घटस्फोट झाला आहे अशा चर्चा सुरु आहेत. अशात आता अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र एका चित्रपटात काम करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. दिग्दर्शक मणिरत्नमच्या गुरु चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आता हे दोघं मणिरत्न यांच्या आणखी एका हिंदी चित्रपटात दिसणार अशी माहिती समोर येत आहे.
 
मणिरत्नम दिग्दर्शित गुरु या चित्रपटातून ऐश्वर्या आणि अभिषेकची उत्तम केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर दिसली होती. टाइम्स नावने दिलेल्या माहितीनुसार मणिरत्नम त्यांच्या नव्या चित्रपटाच्या कास्टिंगमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याला पुन्हा एकदा कास्ट करू शकतात. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी मणिरत्नम यांना अभिषेक आणि ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी एक आकर्षक कथा मिळाली असे सांगितले जात आहे.
 
दरम्यान, ऐश्वर्या अभिषेकच्या घटस्फोटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्यात बऱ्याच गोष्टी बिनसल्या असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचेही म्हटले जात आहे.