आमदार प्रशांत ठाकूर यांना ‘पद्मशाली समाजा’चा पाठिंबा

    06-Nov-2024
Total Views | 33
Prashant Thakur

पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर ( Prashant Thakur ) यांना विधानसभा निवडणुकीसाठी कामोठे येथील पद्मशाली समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभा मतदार संघातून विजयाचा चौकार मारण्यासाठी मतदारांच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने ‘पद्मशाली समाज’ कामोठे यांनी त्यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.

समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या पाठिंबा पत्रात, पनवेल विधानसभा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार ठाकूर यांना ‘पद्मशाली समाज’ कामोठेचा जाहीर पाठींबा देत आहे. आमचा संपूर्ण समाज विरोधकांच्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही, असे नमूद केले आहे. समाज १०० टक्के आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे असल्याची ग्वाही ही दिली आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121