"मंदिरात येऊन माफी माग नाहीतर..." सलमानच्या मागचे धमकीसत्र सुरूच!
05-Nov-2024
Total Views |
मुंबई : मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
ट्रॅफिक कंट्रोल रूमला पाठवलेल्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, " मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलतोय. जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रूपये द्यावेत जर त्याने तसे केले नाही तर आम्ही त्याला मारून टाकू. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे." सबंध प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
धमकीसत्र सुरूच!
गेल्या वर्षी वांद्र येथील सलमान खान यांच्या निवासस्थानी बिश्नोई गँगच्या लोकांनी गोळीबार केला होता. यानंतर सलमान खानला वारंवार धमकीचे संदेश देण्यात आले होते. बाबा सिद्क्की यांच्या हत्येनंतर सदर प्रकरणाची तीव्रता अधिकच वाढली. यामुळेच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. याआधी नोएडा येथील गुफरान खान या २० वर्षीय टॅटू आर्टिस्टला सलमान खान आणि वांद्रे पूर्वचे आमदार झीशान सिद्दीकीला धमकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली. बॉलीवूड चित्रपट 'हम साथ साथ है'च्या शूटिंगदरम्यान राजस्थानमधील काळवीट शिकार प्रकरणामुळे ह्या धमकीसत्राची सुरूवात झाल्याचे म्हटले जात आहे.