माझे मत मंत्री रविंद्र चव्हाण यांनाच : मोहन दातार

    05-Nov-2024
Total Views |
SK

डोंबिवली : ( Mohan Datar ) “आम्ही अनुभवलेला एक काळ असा होता, त्याकाळी संघाशी संबंधित आहे हे सांगण्यात भीती युक्त असुरक्षितता वाटे. मात्र, सध्या अनेक जण अंतस्थ स्वार्थी हेतूने मीही संघाचा स्वयंसेवक कसा आहे, हे सांगण्यास पुढे येतात. प्रत्यक्षात मात्र स्वयंसेवक कधीही पुढे-पुढे करीत नाही. तो आत्मप्रौढी नसतो. त्यामुळे बोगस आदेश आणि बोगस उमेदवारांपासून सावध राहाणे, हेच देश हिताचे ठरेल. माझे आणि अर्थात तुमचेही अमूल्य मत मंत्री रविंद्र चव्हाण यांनाच असणार आहे हे नक्की,” असे परखड मत मूळ, जुने डोंबिवलीकर मोहन दातार यांनी व्यक्त केले.

मंत्री चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ झाल्यानंतर त्यांनी समाज माध्यमांवर जाहीरपणे मत मांडले. पूर्वी मंत्री रविंद्र चव्हाण यांचे नाव उमेदवार म्हणून सूचविण्याचा योग्य निर्णय संघाच्या तत्कालीन अधिकार्‍यांनी घेतला होता. हे कदाचित अनेकांना माहीत नसावे. चर्चेत जी आठ-दहा नावे या मोहिमेत पुढे आली, त्यात संघाची काही जबाबदारी असलेले एक दोन संघ स्वयंसेवक आहेत. एक स्वतःला स्वयंसेवक मानणारे आणि दर निवडणुकी दरम्यान त्यांचा हा छंद जोपासणारे आणि इतर सारे हिंदुत्व विरोधी. कुणी कुणाला हाताशी धरले आहे ते यथावकाश कळेलच, असे सांगून काहींचा नाव न घेता दातार यांनी खरपूस समाचार घेतला.