‘मातंगी स्वायत्त बोट’ हा समाजासाठी अभिमान

    05-Nov-2024
Total Views |
MB

मुंबई : ( Matangi Boat ) दिल्लीत स्वावलंबन २०२४ कार्यक्रमादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या सागरमाला परिक्रमेला हिरवा झेंडा दाखवला होता. क्रू नसलेल्या या बोटीचाही या कार्यक्रमात समावेश होता. या ‘मातंगी बोटी’ने ६०० किलोमीटर अंतराचा प्रवास चालकाशिवाय केला. देशातील पहिल्या स्वायत्त या बोटीने नुकताच नवा विक्रम प्रस्थापित केला. ही ‘ऑटोनोमस मोड’वर चालणारी बोट भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आली आहे. त्याचा वापर सागरी सीमेवर पाळत ठेवण्यासाठी आणि सुरक्षा मोहिमांसाठी केला जाईल.

“मातंगी शक्ती’ ही आदिमहाशक्तीतील नवव्या महाविद्याशक्तीची नाव आहे. ही शास्त्र आणि शस्त्र यांची शक्ती म्हणून मानले जाते. भारतीय नौदालच्या पहिल्या स्वायत्त बोटीचे नाव मातंगी असे ठेवण्यात आले. ही आमच्या मातंग समाजासाठी अभिमानाची घटना आहे,” असे मत मातंग साहित्य परिषद, पुणेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी व्यक्त केले.

तर मुंबईच्या ज्योती साठे मत व्यक्त करताना म्हणाल्या की, “भारतीय नौदलच्या पहिल्या स्वायत्त बोटीचे नाव मातंगी असे ठेवण्यात आले. सागर डिफेन्स कंपनीने बांधलेल्या मातंगी बोटीने मुंबई ते तामिळनाडूतील तुतीकोरीन हे अंतर कापले आहे. ही शक्ती आहे आणि मातंगी देवीच्या नावाने ही शक्ती देशाचे नक्की रक्षण करेल.”