नवी दिल्ली : केंद्र सरकारने विकिपीडियाला (Wikipedia) दिलेल्या माहितीमध्ये पक्षपातीपणात चुकीची माहिती तक्रारीसंदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी विकीपीडियाला नोटिस बजावली आहे. विकीपीडियावरील पक्षपाती भूमिका आणि अनेक काही चुका असल्याबाबतची तक्रार निदर्शनास आणून दिल्या आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंटरनेट इनसायक्लोपीडियाला लिहिलेल्या नोटिसीत म्हटलं गेलं आहे की, संपादकांच्या एरा समूहाचा त्यातील मजकूरावर नियंत्रण आहे. त्यामुळे त्यातील मजकूर हा तटस्थ नसल्याची माहिती समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेतकी, विकीपीडियाला मध्यस्थाऐवजी प्रकाशक म्हणून आपण का समजू नये? असा सवाल करण्यात आला होता. विकीपीडियाच्या माहितीत तटस्थता नसल्याचा आरोप त्यामध्ये करण्या आला आहे. मात्र याबाबतीत कोणतीही एक अधिकृत माहिती विकीपीडियाकडून आलेली नाही.
विकीपीडिया म्हणजे काय?
विकीपीडिया एक असे व्यासपीठ आहे जिथे जगभरातील सर्व माहिती लोकं एका क्लिकवर विकीपीडियाच्या माध्यमातून मिळवू शकतात. मात्र विकीपीडियाच्या लेखात स्वत:हूनही काही लोकं अॅड करु शकतात. त्यामुळे ही माहिती बरोबर असेल असे नाही. तसेच २००१ मध्ये इंग्रजी भाषेछ विकीपीडियाची सुरुवात झाली होती. मात्र आता त्यात प्रादेशिक भाषांमध्ये विकीपीडिया आहे. त्याची सुरूवात जिमी वेल्स आणि लैरी सँगर यांनी केली होती.