कोल्हापूरच्या जागेवरून मविआत ठिणगी! राऊत म्हणाले, "हे दुर्दैव..."

    05-Nov-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरीमा राजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील संतापले होते. त्यानंतर आता या सगळ्यामुळे महाविकास आघाडीतही ठिणगी पडली आहे. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली.
 
हे वाचलंत का? -  ...अशी भाषा वापरण्याची हिंमत होतेच कशी? चित्रा वाघ यांचा काँग्रेस नेत्यांना सवाल
 
संजय राऊत म्हणाले की, "कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी मी स्वत: बैठकीत सात दिवस भांडलो. ही जागा शिवसेनेने सात वेळा जिंकलेली आहे. २०१९ ला अपघाताताने आम्ही हरलो. आम्ही पोटनिवडणूकीत तुम्हाला पाठींबा देतो, परंतू, नंतर ती जागा आम्हाला द्या, असं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला सांगितलं होतं. पण काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे. आज त्या जागेवर गोंधळ निर्माण झाला आहे," असे ते म्हणाले.