केवळ किंग खानच नाही, तर प्रभासने 'पद्मावत' चित्रपटाचीही ऑफर नाकारली होती

    04-Nov-2024
Total Views |

prabahs 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार आता एकत्र येईन दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न नक्कीच करत आहेत. शिवाय अनेक दिग्गज दिग्दर्शकही एकाचवेळी अनेक स्टार्सना त्यांच्या चित्रपटात घेत बिग बजेट चित्रपटही प्रेक्षकांना देत आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' हा देखील चित्रपट याच पठडीतील आहे. कारण या चित्रपटात, दीपिका पडूकोण, रणवीर सिंग आणि शाहीद कपूर अशी मोठी कलाकार मंडळी होती. पण तुम्हाला माहित आहे का दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने हा चित्रपट नाकारला होता.
 
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटातील रतन सिंह यांच्या भूमिकेसाठी शाहीद कपूर निर्मात्यांची पहिली पसंती नव्हता. खरंतर, बाहुबली पाहिल्यानंतर भन्साळींना या भूमिकेसाठी प्रभासला चित्रपटात घ्यायचे होते. परंतु, प्रभासने दीपिकासोबत स्क्रिन शेअर करण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. मात्र, त्यानंतर, कल्की २८९८ या चित्रपटात प्रभास आणि दीपिका यांनी एकत्र काम केलं.
 
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा प्रभासला पद्मावत चित्रपट ऑफर केला होता तेव्हा तो ‘बाहुबली’ चित्रपटाच्या सीक्वेलची तयारी करत होता. प्रभासला भन्साळींसोबत काम करायचं होतं, पण त्याला रणवीर आणि दीपिकासारखी महत्त्वपूर्ण भूमिका अपेक्षित होती. त्याला रतन सिंगची भूमिका फारशी पसंत न पडल्यामुळे त्याने ‘पद्मावत’साठी नकार दिला.
 
बरं, इतकंच नव्हे तर प्रभासने चक्क शाहरुख खानसोबतही काम करण्यास नकार दिला होता. अलिकडेच पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदने प्रभासला एका आगामी हिंदी चित्रपटासाठी विचारले होते. ज्यात शाहरुख खानदेखील झळकणार होता. पण, त्याने ती ऑफर नाकारली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता, पण प्रभासनं स्पष्ट नकार कळवत म्हणाला की, “त्याला मल्टीस्टाररपेक्षा लीड रोल असलेले चित्रपट करायला आवडतात”. दरम्यान, लवकरच प्रभासचे ‘कन्नपा’ आणि ‘राजा साहब’ हे दोन नवे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.