मिथुन चक्रवर्तींच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचं निधन, अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

    04-Nov-2024
Total Views |
 
helena luke
 
 
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी आणि अभिनेत्री हेलेना ल्यूक यांचे अमेरिकेत निधन झाले आहे. रविवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२४ रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रसिद्ध नर्तक आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, अद्याप त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समोर आलं नाही.
 
 
 
हेलेना ल्यूक यांनी आपल्या अभिनयाने ७०-८०चं दशक गाजवलं होतं. ‘आओ प्यार करे’, दो’ गुलाब’, ‘साथ साथ’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. शिवाय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटात त्यांनी काम केलं होतं.