नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन

मलिक कुटुंबावर शोककळा

    03-Nov-2024
Total Views |

nawab malik
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खानं यांचं ३ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. समीर खान यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीकर जखमी झाल्याची माहिती माध्यमांना मिळाली. त्यांच्यावर कोहीनूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शिवाजीनगर-माणकूर विधानसभेचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या कन्या सना मलिक या अणुशक्तीनगरच्या उमेदवार आहे. निवडणुकीच्या तोंडावर मलिक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अणुशक्तीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीब मलिक यांनी आपल्या सोशल मीडीया हँडल वरून या संदर्भात माहिती शेअर केली आहे. या दुखद घटनेनंतर आपले पुढील दोन दिवसांचे सर्व नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली आहे.

हॉस्पिटल जवळ अपघात आणी...
समीर खान १८ सप्टेंबर रोजी रुटीन चेकअपसाठी कुर्ल्यात आपल्या घराजवळ असलेल्या क्रिटी केअर हॉस्पिटल येथे गेले होते. त्यांचं रुटीन चेकअप झाल्यानंतर आपल्या ड्रायव्हरला फोन करुन हॉस्पिटलबाहेर गाडी आणण्यास सांगितले होते. गाडीचालक त्यांची थार गाडी घटनास्थळी घेऊन आला, पण त्याच्याकडून एक गंभीर चूक झाली. त्याने समीर खान यांच्याजवळ आल्यावर ब्रेकवर पाय ठेवण्याच्या ऐवजी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. यामुळे समीर खान यांना थार गाडीने फरफटत नेलं. तसेच या गाडीने अनेक दुचाकींना देखील तुडवल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच त्यांच्या चेहऱ्यालादेखील दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. दरम्यान, या प्रकरणातील गाडीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.