जागतिक निर्यातीत ठरणार 'गेमचेंजर'; जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात भारताचा दबदबा!
03-Nov-2024
Total Views | 46
मुंबई : गेल्या पाच वर्षात भारताने पेट्रोलियम, रत्ने, साखर निर्यातदार म्हणून जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. २०२३ मध्ये पेट्रोलियम निर्यात तब्बल ८४.९६ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर आता भारत जागतिक बाजारपेठेत प्रमुख निर्यातदार म्हणून उदयास येऊ लागला आहे. या संदर्भात वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, वाणिज्य मंत्रालयानुसार, गेल्या पाच वर्षांत पेट्रोलियम, रत्ने, कृषी रसायने आणि साखर यांसारख्या क्षेत्रात निर्यात स्पर्धात्मकता झपाट्याने वाढ झाली आहे. तसेच, २०१८ ते २०२३ या कालावधीत भारताच्या निर्यातीत वृध्दी होत आहे. मंत्रालयाच्या डेटानुसार २०२३ पर्यंत पेट्रोलियम निर्यात ८४.९६ अब्ज युएस डॉलर वाढ दिसून आली आहे. त्याचबरोबर, विविध क्षेत्रांमधील जागतिक व्यापारात भारताचा वाटा आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
निर्यातीवर लक्ष टाकल्यास जागतिक व्यापारातील भारताचा बाजारपेठेतील हिस्सा २०१८ मध्ये ६.४५ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १२.५९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. इलेक्ट्रिकल वस्तू, वायवीय टायर, टॅप आणि व्हॉल्व्ह आणि सेमीकंडक्टर उपकरणांमध्येही वाटा वाढला आहे. विशेष म्हणजे भारत पाचव्या स्थानावरून वाढून या श्रेणीतील दुसरा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान खडे क्षेत्रातील जागतिक निर्यातीतील देश जागतिक व्यापारात दुसऱ्या स्थानावरून अव्वल स्थानावर गेला आहे.