"आव्हाडांना त्यांच्या कळवा - मुंब्र्यात येऊनच उत्तर देणार ....." अमोल मिटकरींचे जितेंद्र आव्हाडांना आव्हान
03-Nov-2024
Total Views | 21
मुंबई : ( Amol Mitkari on Jitendra Awhad ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यात अजित पवारांवर गरळ ओकत खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अजित पवारांवर बोलताना आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन आता आमदार अमोल मिटकरींनी जोरदार पलटवार केला. 'अजितदादांबद्दल एकेरी बोलतांना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या घाण वाणीतून नेहमीप्रमाणे स्वतःची लायकी दाखवली आहे. ते नेमके कुणाची औलाद आहेत, हे मी स्वतः आव्हाडांना त्यांच्या कळवा मुंब्र्यात येऊनच प्रचार सभेतून जाहीर सांगणार, त्यांनी त्यांचे गुंड सभा ऐकायला पाठवावेत' असे प्रतिआव्हान मिटकरींनी दिले आहे.
खालच्या भाषेत बोलणे ही आव्हांडांची संस्कृती असल्याचे मिटकरी म्हणाले. आव्हाडांचे वक्तव्य हे अजित पवारांच्या आई-वडिलांचा अपमान करणारे आहे, असे मिटकरी म्हणाले. आव्हाडांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे समर्थन आहे का? असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे. समर्थन नसल्यास सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आव्हाडांचे थोबाड फोडावे, असेही ते म्हणाले.