एन.डी.स्टुडिओ गोरेगाव फिल्मसीटीच्या ताब्यात

    29-Nov-2024
Total Views | 51
N D Studio

मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ ( N D Studio ) ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने (फिल्मसीटी) परिचालनासाठी ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाने ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने सादर केलेल्या रिसोल्यूशन प्लॅनला दि. १४ नोव्हेंबर रोजी मान्यता दिल्याने यापुढे एन.डी.स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखा विषयक कामे शासनाच्या वतीने महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरु राहणार आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121