पंतप्रधान मोदी यांना गयाना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
21-Nov-2024
Total Views |
जॉर्जटाउन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना देशाच्या ऑर्डर ऑफ एक्सेलेन्स हा सर्वेच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. या पुस्काराच्या लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की " हा सन्मान केवळ माझा नसून १४० कोटी भारतीयांचा आहे. इतिहास, संस्कृतिक वारसा आणि विश्वासवर आधारित भारत आणि गयाना यांच्यातील नातं असेच समृद्धी होऊन वाढत राहिल अशी आशा मी व्यक्त करतो. गयानाचा पुरस्कार प्राप्त करणारे जगातील चौथे परदेशी नागरिक ठरले आहेत.
पंतप्रधान यांनी गयानाला दिलेली भेट भारताच्या प्रभाव क्षेत्राच्या विस्तारत्या परिघाचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे.
अलिकडच्या काळात गयाना, बार्बाडोस आणि इतर देशांमध्ये पंतप्रधान मोदी यांचे झालेले कौतुक, जागतिक स्तरावर भारताचे महत्वपूर्ण स्थान अधोरेखित करणारे आहे. गयानाचे पंतप्रधान यांनी या सत्कार सोहळ्यात म्हटले की " तंत्रज्ञानाच्या विकासामुळे देशांमधील दरी कमी व्हायला हवी. संपन्न्ता आणि दरिद्रय यांच्यातील दरी कमी व्हायला हवी. ही दरी कमी करण्याचे काम भारत करत आहे. आम्हा दोघांमध्ये केवळ बैठक आणि चर्चा झाली नाही. विविध आव्हानांनासामोरं जाण्यासाठी जी वचनबद्धता लागते, त्या संबंधी आमच्यात विचारमंथन झाले."