राजगीर : बिहार येथील राजगीर येथे नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत महिला गटाच्या भारतीय संघाने तिंरगा फडकवत चीनला चारी मुंड्या चीत केले असून तिसरा विजय मिळवला आहे. 'गोल्डन गर्ल' दीपिकाने या स्पर्धेत ११ व्या गोलाच्या जोरावर रौप्यपदक विजेत्या चीनचा पराभव करत धूळ चारली आहे.
महिला हॉकी संघाने ०-० असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे जेतेपद राखले आहे. गेल्या वर्षी रांची आणि २०१६ या वर्षी सिंगापूर येथे जेतेपद मिळवणाऱ्या महिला हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. आता भारतीय संघाने संयम ठेवत आपला खेळ दाखवत चीनला स्पर्धेतून बाहेर काढले.
यावेळी भारताला चौथ्या मिनिटाला गोल करण्याची संधी होती. ज्यावेळी सुनेलिता टोप्पो या खेळाडूने आपला खेळ दाखवत आपल्या उजव्या बाजूला चेंडू ठेवत विरोधकांच्या पक्षात चेंडू जाऊ नये याची दक्षता घेत त्या पुढे सरसावल्या. मात्र यावेळी चीनच्या गोलकीपरने डोळ्यात तेल घालत चेंडू अडवला. दुसऱ्या क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटावेळी चीनला पेनल्टी मिळाली. मात्र यावेळी चालु डावामध्ये चीनच्या खेळाड़ू झिनझुआंग यांनी मारलेला फटका हा भारतीय गोलकीपर बिच्छु देवीने उजव्या बाजूला झेप घेत गोल वाचवला. दरम्यान, २० व्या ते २१ व्या मिनिटांवेळी भारताला मिळालेले चार पेनल्टी कॉर्नर व्यर्थ गेले.
दरम्यान,आता सलीमा टेटेंच्या नेतृत्वाखाली भारताने महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला गेला नाही. भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला असून २०१६, २०२३ आणि तिसऱ्यांदा २०२४ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद मिळवले.