ठाकरे गटाचे केदार दिघे यांच्यासह आठ जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा

गाडीत विदेशी मद्य आणि पैशांची पाकिटे सापडली

    20-Nov-2024
Total Views | 65
Kedar Dighe

ठाणे : ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या ठाकरे गटाच्या केदार दिघे ( Kedar Dighe ) यांच्यासह आठ जणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरीच्या अष्टविनायक चौकात पकडलेल्या वाहनात विदेशी मद्य आणि पैशांनी भरलेली २६ पाकिटे आढळल्याचे तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, गाडीच्या तपासणीत काहीही आढळले नसताना जाणीवपूर्वक आपले नाव या प्रकरणात गोवल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे.

कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उबाठाचे केदार दिघे हे निवडणूक लढवत आहे. दिघे यांच्याविरोधात शिंदे गटातील एका महिला पदाधिकारीने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास कोपरी येथील अष्टविनायक चौकात एका वाहनाची तपासणी केली. उबाठा गटाचे सचिन गोरिवले नामक कार्यकर्त्यांच्या या वाहनामध्ये मद्य आणि प्रत्येकी दोन हजार रुपये भरलेली २६ पाकिटे आढळली. या तक्रारीनुसार केदार दिघे यांच्यासह सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे, रविंद्र शिनलकर, प्रशांत जगदाळे, दत्ता पागवले, अनिता प्रभू, पांडुरंग दळवी, ब्रीद या कार्यकर्त्यावर कोपरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.मात्र, केदार दिघे यांनी वाहनाच्या तपासणीचा व्हिडिओ जारी करून जाणीवपूूर्वक आपणास गोवल्याचे म्हटले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121