सुप्रिया सुळेंवरील आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, "तो आवाज माझ्या बहिणीचा...."

    20-Nov-2024
Total Views | 38
 
ajit pawar
 
( Image Source : ANI ) 
मुंबई : (Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यानंतर सत्य समोर येईल." असे ते म्हणाले.
 
अजित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची समजली जात आहे.
 
काय म्हणाले शरद पवार?
 
“जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती, त्याची नोंद तरी कशी घ्यायची? माझ्या मते त्याची नोंदही घ्यायची आवश्यकता नाही”, असं म्हणत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121