रशिया-युक्रेन युद्धात 'अणुबॉम्ब' ची एन्ट्री ? पुतिन यांचा इशारा!

    19-Nov-2024
Total Views |

putinn

मॉस्को : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता १००० दिवस पूर्ण झाले आहेत. महिन्याभरात जे युद्ध संपेल अशी आशा होती, त्याला आता २ वर्षांहून अधिकचा काळ उलटला आहे. या युद्धात कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून लाखो लोक यामुळे स्थलांतरीत झाले आहे. अशातच, आता १९ नोव्हेंबर रोजी रशियाचे पंतप्रधान पुतिन यांनी आण्विक शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो अशी भूमिका घेऊन, जगभरात एकूणच चिंतेचं वातावरण पसरले आहे.

रशियाच्या नव्या तत्तवप्रणालीनुसार, आण्विक शक्तींनी पाठिंबा दिल्यास रशिया अण्वस्त्र नसलेल्या राज्याविरुद्ध अण्वस्त्रे वापरण्याचा विचार करणार आहे, याच बरोबर आण्विक राज्याच्या सहभागासह अण्वस्त्र नसलेल्या राज्याने केलेले आक्रमण हे संयुक्त आक्रमण मानले जाईल अशी माहिती क्रेमलीनचे पुतिन सरकारमधील प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिली आहे. त्याच बरोबर पेस्कोव्ह पुढे म्हणतात - रशियाने नेहमीच अण्वस्त्रांच्या वापराकडे प्रतिबंधाचे साधन म्हणून पाहिले आहे त्याच बरोबर ते म्हणाले की, रशियाला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडण्यात आले तरच ते तैनात केले जातील.

अमेरीकेमुळे टोकाची भूमिका ?
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरीकेसह पाश्चिमात्य देश हे युक्रेनच्या पाठीशी उभे असल्याचा आरोप पुतिन यांनी वारंवार केला आहे. पाश्चिमात्य देशातील काही नेत्यांनी खुलेआम पुतिन यांच्या विरोधात वक्तव्यं केली होती. अशातच, आता अमेरीकेतल्या जो बायडन यांच्या प्रशासनाने युक्रेन देशाला लष्करी पाठिंबा दर्शवला आहे. वेळ पडल्यास रशियाच्या विरोधात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जाऊ शकतो अशा अर्थाचा पाठिंबा अमेरीकेने युक्रेनला देऊ केला आहे. यामुळेच रशियाने ही टोकाची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.