वॉशिंग्टन डीसी : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरीकेत अटक करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अमेरीकेतल्या कॅलिफोरनीया परिसरात अनमोलच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अमेरीकेच्या पोलीस कस्टडीत त्याला ठेवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ असून आपल्या भावाप्रमाणेच तो सुद्धा ' मोस्ट वॉनटेड क्रिमीनल ' आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचा खून झाला होता. या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोईवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या असो किंवा सलमान खान याच्या घरासमोर झालेला हल्ला असो, अनमोल बिश्नोई या सगळ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याची माहिती मिळाली आहे. पंजाब मधील फझीलका इथला राहणाऱ्या अनमोल वर १० लाखाचे इनाम घोषित केले होते. राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोईवर एकूण ३१ गुन्हे दाखल केले गेले आहेत. यातील २२ गुन्हे राजस्थान दाखल केले गेले आहेत. आपल्या टोळीसहित खंडणी वसूल करणे, हत्यार पुरवणे, खून करणे या सारखी कामं करीत होता. मुंबई मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तो प्रकाशझोतात आला.
' या ' सुप्रसिद्ध गायकाचा खून
अनमोल बिश्नोईने आपला भाऊ लॉरेन्सच्या पावलावर पाऊल ठेवत गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार अनमोल बिश्नोई काही काळ कॅनडा मध्ये राहत होता. २०२२ साली सुप्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे अनमोलचा हात असल्यची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. या बरोबरच १४ अप्रिल रोजी सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबारात त्याचाच हात होता. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यावेळेस मारोकऱ्यांना बंदूका पुरवण्याचे काम सुद्धा अनमोलनीच केले होते.
अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची सुरूवात मुंबईच्यो पोलिसांनी महिन्याभरापूर्वीच सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर त्याची अटक म्हणजे महत्वाचा टप्पा मानला जातो आहे.