तोफा थंडावल्या; आता सोशल मीडियावर करडी नजर

    19-Nov-2024
Total Views | 40
Social Media

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा सोमवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी थंडावल्या. मात्र, सोशल मीडियात ( Social Media ) प्रचाराचा धुरळा उडणार असल्याने येथील अपप्रचार आणि चुकीच्या प्रचारावर प्रशासनाची २४x७ करडी नजर असणार आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नसल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिनगारे यांनी दि. २० नोव्हेंबर रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १० हजार, ९३५ पोलीस कर्मचारी व ४ हजार, १६१ होमगार्डसह २४ पथके सज्ज असल्याचे सांगितले. तर प्रत्येक मतदान केंद्रांवर सिसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे, असे ते म्हणाले. मतदान यंत्राची सरमिसळ प्रक्रियेची तिसरी फेरी पूर्ण झाली आहे. ‘सी-व्हिजील’ अ‍ॅपवर एकूण १ हजार, ६५५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९३ टक्के तक्रारींचे निराकरण १०० मिनिटांऐवजी ४८ मिनिटांच्या आत करण्यात आले आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोई-सुविधा तसेच मंडपातील केंद्रात मोबाईल टॉयलेटची सुविधा करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात एकही पेड न्यूज नाही

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ छापल्या जाणार्‍या पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या एकत्रित प्रमाणीकरण व माध्यम (एमसीएम) कक्षाकडे एकूण १२७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ३५८ व्हिडिओ, ४९ ऑडिओ, सहा पथनाट्य, तीन आयव्हीआर कॉल, एक टेक्स्ट मेसेज, एक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज, ११० डिजिटल पोस्टर, अशा एकूण ५२८ मजकुरांना परवानग्या देण्यात आल्या. यात एकही पेड न्यूजचे प्रकरण नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121